राजमाता जिजाऊ मित्र मंडळाच्या वतीने २०० विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
नाशिक, दि. २३ : शालांत परीक्षेत व उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर केल्यास जीवनात उत्तम यश संपादन करता येते असे प्रतिपादन आ. राहुल ढिकले यांनी केले. पंचवटीतील तारवाला नगर मधील धर्मवीर संभाजी चौकातील राजमाता जिजाऊ मित्र मंडळाच्या वतीने शालांत परीक्षा व उच्च माध्यमिक शालांत परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव समारंभात आमदार ढिकले बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष प्रशांत जाधव होते. याप्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आयएएस परीक्षा उत्तीर्ण झालेले विनय पाटील, स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शक प्रा. राम खैरनार, भाजपाचे सरचिटणीस नानाभाऊ शिलेदार, भाजपा युवा पार्टीचे अध्यक्ष अमित घुगे, भाजपाचे अल्पसंख्याक प्रमुख आरिफ कादिर, शहर प्रसिद्धी प्रमुख राहुल कुलकर्णी ,ज्येष्ठ शिक्षक दिलीप अहिरे उपस्थित होते. विनय पाटील यांनी आपल्या जीवनात यशस्वी होण्यासाठी वाचनात सातत्य महत्त्वाचे असून आई-वडील व पाल्य यांच्याशी सुसंवाद साधने महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन केले तर प्रा. राम खैरनार यांनी स्पर्धा परीक्षा उत्तम मार्ग असून जिद्दीने व चिकाटीने अभ्यास केल्यास उत्तम यश संपादन करता येते. प्रत्येकाने स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवणे गरजेचे आहे. प्रभागातील दहावी व बारावी परीक्षेतील दोनशे विद्यार्थ्यांचा यावेळी नगरसेवक जगदीश पाटील यांच्या वतीने स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. स्वागत व प्रास्ताविक नगरसेवक जगदीश पाटील यांनी केले. अजय कोर यांनी सूत्रसंचालन केले. गौरव पलांगे यांनी उपस्थितांचे आभार मानले. गणेश नवले, प्रीतेश जाधव,भा.रा.सूर्यवंशी आदी उपस्थित होते.यांचा झाला विशेष गौरवविनय पाटील(आय ए एस),राहुल कापडणीस(सहाय्यक अभियंता),दिलीप अहिरे(विद्यावाचस्पती), वैभव लिलके (जलसंधारण अधिकारी), मंगेश गोवर्धने (स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक), लक्ष्मण कुमावत, (रचना सहाय्यक अभियंता), प्रवीण शिंदे (शिक्षक), आकाश ढेपे (जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक), यादव नामदेव वलेकर (पोलिस अधिकारी)