शरद पवार गटाचे उमेदवार निलेश लंके यांनी माजी खासदार सुजय विखे पाटील यांचा पराभव केला.
नगर, दि. ११ : कामं करूनही आपल्याला वेगळा निकाल पाहायला मिळाला. यातून मी एक अनुभव घेतला आहे. अनुभवातून माणसं शिकत असतात. त्यानुसार मी आता लोकांशी संपर्क वाढवणार आहे.” मी तुमच्यासाठी दिवसाचे २४ तास, आठवड्याचे सातही दिवस उपलब्ध असेन. आता मी ठरवलंय मतदारसंघातील लोकांना वेळ द्यायचा आहे. तुमचा वाढदिवस असेल तर त्या वाढदिवसाला मी हजर असेन, कोणाच्या घरी दहावं असेल तर लगेच सांगा, कावळ्याच्या आधी तिथे सुजय विखे पाटील पोहोचेल. असे वक्तव्य माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी केले आहे. लोकसभा निवडणुकीत अहमदनगर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटाचे उमेदवार निलेश लंके यांनी माजी खासदार सुजय विखे पाटील यांचा पराभव केला. सुजय विखे यांनी मतदारसंघात जोरदार प्रचार केला होता. त्यांच्यासाठी त्यांचे वडील महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजप नेतृत्वाने सर्व प्रकारचे प्रयत्न करूनही निलेश लंके यांनी विजय मिळवला.