IMG-LOGO
राष्ट्रीय

सीबीआयवर ताशेरे ओढत न्यायालयाकडून केजरीवाल यांना जामीन

Saturday, Sep 14
IMG

दिल्लीसह हरियाणातही आपच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी जल्लोष केला.

दिल्ली, दि. १४ :  मद्याविक्री घोटाळ्याप्रकरणी गेल्या साडेतीन महिन्यांपासून तिहार तुरुंगात असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी जामीन मंजूर केला. केजरीवाल यांना दीर्घकाळ तुरुंगात डांबून ठेवणे गैर असल्याचे सांगताना सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठातील एका न्यायमूर्तींनी याबद्दल सीबीआयची कानउघाडणीही केली. न्यायालयाने आदेश प्राप्त होताच शुक्रवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास केजरीवाल यांची तिहार कारागृहातून सुटका करण्यात आली. केजरीवाल यांना जामीन मंजूर करताना सर्वोच्च न्यायालयाने त्यांना दिल्लीच्या सचिवालयात जाण्यास मज्जाव केला असून नायब राज्यपालांच्या परवानगीविना कोणत्याही फायलीवर स्वाक्षरी करण्यास मनाई केली आहे. दुसरीकडे, जम्मू-काश्मीर, हरियाणातील निवडणूक रणधुमाळीच्या मध्यात केजरीवाल यांची सुटका झाल्याने आम आदमी पक्षाला मोठा दिलासा मिळाला असून दिल्लीसह हरियाणातही आपच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी जल्लोष केला.

Share: