IMG-LOGO
क्रीडा

T20 World Cup 2024 IND vs SA Final : महेंद्रसिंग धोनी, सचिन तेंडुलकरची टीम इंडियासाठी खास पोस्ट

Sunday, Jun 30
IMG

या पोस्टमध्ये सचिननं भारताच्या दिग्गज त्रिकुटाचंही कौतुक केलं आहे. Special post by Mahendra Singh Dhoni Sachin Tendulkar for Team India

बारबोडस, दि. ३० :   शेवटच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या रोमहर्षक सामन्यात टीम इंडियाने १४० कोटी भारतीयांचे स्वप्न साकारले.भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला नमवत टी-२० विश्वचषकाचे जेतेपद पटकावले आहे. भारताने शनिवारी (२९ जून) बार्बाडोस येथे दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून टी-२० विश्वचषक २०२४ जिंकत आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवला. या विजयानंतर सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी सारख्या दिग्गज खेळाडूंनी टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या आहेत. कर्णधार रोहित शर्मा आहे, तसाच भारताच्या अंतिम सामन्यातील विजयाचा शिल्पकार ठरलेला किंग कोहलीही आहे. त्याचवेळी मालिकावीराचा खिताब पटकावणारा बुम बुम बुमराहदेखील आहे. पण एका व्यक्तीचा विशेष उल्लेख करून आपण त्याच्यासाठी खूप खुश आहोत, असं सचिननं म्हटलं आहे. ही विशेष व्यक्ती आणि सचिन जिचा मित्र म्हणून उल्लेख करतोय, ती म्हणजे अर्थात भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक आणि सचिनचा एकेकाळचा टीममेट राहुल द्रविड!  टीम इंडियाच्या जर्सीवर समाविष्ट होणारा असा प्रत्येक स्टार भारतातील उद्याच्या क्रिकेटपटूंच्या पिढीला त्यांच्या डोळ्यांमधली ती स्वप्नं पूर्ण करण्यासाठी बळ देणारा ठरणार आहे. भारतानं विश्वविजयाचा चौथा स्टार या विजयानं मिळवला आहे.  या पोस्टमध्ये सचिननं भारताच्या दिग्गज त्रिकुटाचंही कौतुक केलं आहे. “मी रोहित शर्माविषयी काय बोलू? जबरदस्त कॅप्टन्सी! २०२३ च्या एकदिवसीय वर्ल्डकपमधील पराभव मागे सारून टी २० वर्ल्डकपसाठी आपल्या खेळाडूंना सतत प्रोत्साहन देत राहाणं हे कौतुकास्पद आणि अभिमानास्पद आहे”, असं सचिननं या पोस्टमध्ये म्हटलं आहे. “जसप्रीत बुमराह आणि विराट कोहली यांची कामगिरी मालिकावीर आणि सामनावीराच्या पुरस्काराला साजेशी अशीच होती. जेव्हा संघाला गरज होती, तेव्हा त्यांनी सर्वोत्तम खेळ केला”, असंही सचिननं पोस्टमध्ये म्हटलं आहे. टी २० वर्ल्डकपमधलाभारतासाठीचा दुसरा स्टार”, असं म्हणत सचिन तेंडुलकरनं संपूर्ण टीम इंडियाचं अभिनंदन केलं आहे. सचिन तेंडुलकरनं राहुल द्रविड या त्याच्या मित्राचा विशेष उल्लेख या पोस्टमध्ये केला आहे. “वेस्ट इंडिजमध्ये टीम इंडियासाठी जणूकाही एक पूर्ण चक्रच पूर्ण झालं. २००७ साली तिथे झालेल्या एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकातील आपल्या पराभवापासून ते काल तिथे टीम इंडियानं साजऱ्या केलेल्या टी २० विश्वचषक २०२४ मधील विजयापर्यंत! माझा मित्र राहुल द्रविडसाठी मी खूप खूश आहे. तू २०११ चा वर्ल्डकप मिस केलास. पण टी २० वर्ल्डकपमधील विजयात तुझं योगदान अमूल्य असं आहे. मी त्याच्यासाठी खूप खूश आहे”, असं सचिननं पोस्टमध्ये म्हटलं आहे. राहुल द्रविडसोबतच पारस म्हांब्रे आणि विक्रम राठोड यांनीही १९९६ सालीच त्यांच्या आंतरराष्ट्रीय कारकि‍र्दीला सुरुवात केली होती. टीम इंडियानं १९९६ च्या या दिग्गजांच्या मार्गदर्शनाखाली हे यश संपादित केलं हे पाहून खूप आनंद होत आहे”, असं सचिननं नमूद केलं आहे. “ही एक संपूर्णपणे सांघिक कामगिरी आहे. सर्व खेळाडू, प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफ आणि बीसीसीआयचे मनापासून आभार!” असंही पोस्टच्या शेवटी सचिननं म्हटलं आहे.महेंद्रसिंग धोनीच्या पोस्टमध्ये काय ? भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी इन्स्टाग्रामवर पोस्ट करताना लिहले, “टीम इंडिया विश्वविजेते! फायनल पाहताना माझे हृदयाचे ठोके वाढले होते. दडपणाच्या स्थितीत शांत राहून, स्वत:च्या कौशल्यांवर विश्वास ठेऊन तुम्ही विजयश्री खेचून आणलीत. याकरता तुमचं मनापासून अभिनंदन. वर्ल्डकप पुन्हा भारतात आणल्याबद्दल समस्त भारतीयांच्या वतीने धन्यवाद आणि खूप शुभेच्छा!”

Share: