IMG-LOGO
राष्ट्रीय

डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी तातडीने पावले उचला ; सर्वोच्च न्यायालयाचे सरकारांना निर्देश

Thursday, Aug 22
IMG

कोलकात्यातील बलात्कार-हत्या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाने स्वत:हून दखल घेत याचिका दाखल केली आहे.

नवी दिल्ली, दि. २२  : कोलकात्याच्या आर. जी. कर वैद्याकीय महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास लावलेला विलंब ही ‘अतिशय चिंताजनक’ बाब आहे, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी खडसावले. तसेच डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देशही केंद्र आणि सर्व राज्य सरकारांना न्यायालयाने दिले.कोलकात्यातील बलात्कार-हत्या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाने स्वत:हून दखल घेत याचिका दाखल केली आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठासमोर गुरुवारी झालेल्या सुनावणीमध्ये न्यायालयाने आपला कठोर पवित्रा कायम ठेवला.

Share: