IMG-LOGO
राष्ट्रीय

निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या, काँग्रेस देशपातळीवर चालवणार अभियान

Tuesday, Nov 26
IMG

निवडणुका बॅलेट पेपरद्वारे व्हाव्यात. तसे केले तर या लोकांना कळेल की ते किती पाण्यात आहेत.

दिल्ली, दि. २६ : ईव्हीएमच्या माध्यमातून निवडणुका न घेता बॅलेट पेपरच्या माध्यमातून देशभरातील निवडणुका घ्याव्यात, या मागणीसाठी काँग्रेसने देशव्यापी मोहिमेची घोषणा केली आहे. पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मंगळवारी ही घोषणा केली. निवडणुका केवळ मतपत्रिकेने व्हाव्यात, अशी आमची इच्छा असून त्यासाठी भारत जोडा यात्रेच्या धर्तीवर देशभर आत मोहीम राबवणार असल्याचे त्यांनी सांगितले. खर्गे म्हणाले की, ओबीसी, एससी, एसटी आणि दुर्बल घटकांनी पूर्ण ताकदीनिशी जी मते दिली आहेत ती वाया जात आहेत. आमची मागणी आहे की, सर्व निवडणुका मतपत्रिकेवर घ्याव्यात. ईव्हीएम मशीन त्यांना आपल्या घरात ठेवू द्या. अहमदाबादमध्ये बरीच गोदामे आहेत, त्यामध्ये नेऊन यंत्रे ठेवावीत. आमची एकच मागणी आहे की, निवडणुका बॅलेट पेपरद्वारे व्हाव्यात. तसे केले तर या लोकांना कळेल की ते किती पाण्यात आहेत.

Share: