अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास हा हल्ला झाला.
राजौरी, दि. २२ : जम्मू-काश्मीरच्या राजौरीमध्ये पुन्हा एकदा दहशतवाही हल्ला झाला आहे. या हल्ल्यात एक जवान जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. नुकताच शौर्यचक्र पुरस्कार मिळालेल्या परशोत्तम कुमार यांच्या घराजवळील लष्कराच्या सुरक्षा पोस्टवर दहशतवाद्यांनी हा हल्ला केला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास हा हल्ला झाला.