IMG-LOGO
शिक्षण

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे २५ ऑगस्ट, २०२४ रोजीची महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलली

Friday, Aug 23
IMG

सुधारित दिनांक लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे आयोगाने कळविले आहे.

मुंबई, दि.२३ : राज्य शासनाच्या सेवेतील विविध संवर्गातील पद भरतीकरीता दि. २९ डिसेंबर, २०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीस अनुसरून विषयांकित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ रविवार, दि. २५ ऑगस्ट, २०२४ रोजी घेण्याचे नियोजित होते. यासंदर्भात आज दि. २२ ऑगस्ट, २०२४ रोजी झालेल्या आयोगाच्या बैठकीमध्ये रविवार, दि. २५ ऑगस्ट, २०२४ रोजी घेण्यात येणारी महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या परीक्षेची सुधारित दिनांक लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे आयोगाने कळविले आहे.

Share: