शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी जयंत पाटील थेट मातोश्रीवर पोहोचणार आहेत.
मुंबई, दि. २० : महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आणि ठाकरे गटामधील वाद विकोपाला गेला आहे. विदर्भातील जागांवरून ठाकरे गटाने आक्रमक पवित्रा घेतल्याने आणि काँग्रेस सुद्धा आपली भूमिका सोडायला तयार नसल्याने आता या वादामध्ये थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवेश झाला आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांमधील वाद कोणत्याही परिस्थितीत थांबवण्यासाठी पहिल्यांदा शरद पवार यांनी पुढाकार घेतल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सुद्धा पुढाकार घेतला आहे. त्यामुळे वाद कोणत्याही परिस्थितीत थांबवून जागावाटप तातडीने करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी जयंत पाटील थेट मातोश्रीवर पोहोचणार आहेत.