IMG-LOGO
मनोरंजन

एका नेत्याचं जीवन कसं असतं, हे लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे : ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ

Sunday, Jul 21
IMG

प्रवीण तरडे दिग्दर्शित या चित्रपटात आनंद दिघेंची भूमिका प्रसाद ओक यांनी निभावली आहे.

मुंबई, दि. २१ : शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित ‘धर्मवीर : मुक्काम पोस्ट ठाणे’ २०२२ मध्ये दिग्दर्शित झालेल्या या चित्रपटाचा दुसरा भाग आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचचा सोहळा आयोजित करण्यात आला होता. चित्रपटाचा ट्रेलर बघता, ‘धर्मवीर‘चा हा दुसरा भागदेखील हिट व्हायला हरकत नाही. मी सगळ्यांना शुभेच्छा देतो. त्यांनी या चित्रपटाचे दोन, तीन किंवा चार कितीही भाग बनवावेत. त्यांनी ते बनवले पाहिजेत आणि लोकांपर्यंत एका नेत्याचं जीवन कसं असतं, हे पोहोचवलं पाहिजे, ते दाखवलं पाहिजे, असं मला मनोमन वाटतं”, असे विधान ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी केले आहे. शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या आयुष्यावर बेतलेल्या या चित्रपटाच्या सीक्वेलच्या ट्रेलरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दिग्गज अभिनेते अशोक सराफ, गोविंदा, निवेदिता सराफ, सिद्धार्थ जाधव, अमृता खानविलकर या ट्रेलर लाँचवेळी उपस्थित होते. यावेळी अभिनेता सलमान खाननेदेखील हजेरी लावली होती. एका राजकीय क्षेत्रातील व्यक्तीवर अशा चित्रपटाची निर्मिती होऊ शकते, हे पहिल्यांदाच बघितलं. राजकारण व अभिनय दोन वेगळी टोकं असतानादेखील एक सुंदर चित्रपट बनू शकतो, हे आम्ही ‘धर्मवीर : मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट आला तेव्हा आम्ही हे पाहिलेलं आहे असे त्यांनी म्हटले आहे. प्रवीण तरडे दिग्दर्शित या चित्रपटात आनंद दिघेंची भूमिका प्रसाद ओक यांनी निभावली आहे. 

Share: