IMG-LOGO
महाराष्ट्र

महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भाजपकडेच राहणार

Tuesday, Nov 26
IMG

याबाबत लवकरत अधिकृत घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.

मुंबई, दि. २६ : राज्यात नवे सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्नांना वेग आला असला तरी मुख्यमंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरू असल्याचे पाहायला मिळाले. मात्र, महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण असणार? याबाबत काल दिल्लीत निर्णय झाला. मुख्यमंत्रीपद भाजपकडेच राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आल्याने राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याचा चर्चा सुरू झाल्या. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. मुख्यमंत्रीपदाच्या बदल्यात भाजपने एकनाथ शिंदे यांच्यासमोर दोन पर्याय ठेवले असल्याची माहिती समोर आली.भाजपने एकनाथ शिंदे यांच्यासमोर केंद्रीय मंत्रीमंडळात स्थान किंवा राज्यात उपमुख्यमंत्री पद असे दोन पर्याय ठेवल्याचे सांगितले जात आहे. याबाबत लवकरत अधिकृत घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.

Share: