IMG-LOGO
नाशिक शहर

टेम्पो डिव्हायडर तोडून कारवर धडकला; चारजण जागीच ठार

Sunday, Jul 14
IMG

टेम्पो डिव्हायडर तोडून समोरून येणाऱ्या कारवर जाऊन धडकल्याने हा अपघात झाला.

नाशिक, दि. १४ :  नाशिकमध्ये कार आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. नाशिकच्या आडगाव परिसरात शनिवारी (दि.१३) रात्री ११ वाजेच्या सुमारास ही घटना घडली.ट्रक आणि ब्रिझा कारची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला आहे. अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये अक्षय जाधव, सज्जू शेख, अरबाज तांबोळी आणि रहेमान तांबोळी यांचा समावेश आहे. टेम्पो डिव्हायडर तोडून समोरून येणाऱ्या कारवर जाऊन धडकल्याने हा अपघात झाला. 

Share: