आरोपीचा पाठलाग करून रेल्वे पोलिसांनी त्याला अटक केली आहे. ही घटना प्लॅटफॉर्म क्रमांक ७ वर घडली.
नागपूर, दि. ७ : नागपूर रेल्वेस्थानकावर खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. एका मनोरुग्णाने रेल्वे ट्रॅकवरील राफ्टर घेऊन रेल्वेस्थानकावरील नागरिकांना मारत सुटला. या घटनेत दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपीचा पाठलाग करून रेल्वे पोलिसांनी त्याला अटक केली आहे. ही घटना प्लॅटफॉर्म क्रमांक ७ वर घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जयराम रामअवतार केवट (वय ३५) असे आरोपीचे नाव आहे. गणेश कुमार डी (वय ५४) असे मृत प्रवाशाचे नाव आहे. तर दुसऱ्या मृत व्यक्तिची अद्याप ओळख पटली नाही.