कसाबला बिर्याणी खायला देणाऱ्या काँग्रेससोबत उद्धव ठाकरे गेले आहेत.
पुणे, दि. २२ : अमित शाहांनी उद्धव ठाकरे, शरद पवार आणि राहुल गांधींवर जहरी टीका केली. स्वत:ला बाळासाहेबांचे वारस सांगणारे उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे नेते बनले असा घणाघात अमित शाहांनी उद्धव ठाकरेंवर केला. कसाबला बिर्याणी खायला देणाऱ्या काँग्रेससोबत उद्धव ठाकरे गेले आहेत, याकुब मेननला सोडण्याची मागणी करणाऱ्यांबरोबर ठाकरे बसले आहेत, झाकिर नाईक यांना शांततादूत बवनण्यांच्या मांडीवर उद्धव ठाकरे बसले आहेत, PFI या संघटनेला पाठिंबा देणाऱ्यांचा मांडीला मांडी लावून उद्धव ठाकरे बसले आहेत, संभाजीनगरला विरोध करणाऱ्यांना पण हे साथ देत आहेत, यांना लाज वाटली पाहिजे ” अशी टीका अमित शाह यांनी यावेळी केली. पुण्यात गेले दोन दिवस भाजपाच्या राज्य कार्यकारिणीचे आयोजन केले होते. याचा समारोप केंद्रीय गृहमंत्री, भाजपाचे नेते अमित शाह यांच्या भाषणाने झाला. त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी तयारीला लागण्याच्या सूचना केल्या. यावेळी पण भाजपाच्या नेत्वृत्वाखाली महायुती पुन्हा सत्तेत येईल असा विश्वास शाह यांनी व्यक्त केला.