IMG-LOGO
महाराष्ट्र

नरेंद्र मोदी, भाजप, शिंदे, राज ठाकरे, फडणवीस सगळ्यांचाच उद्धव ठाकरेंकडून समाचार ; विधानसभेसाठी दिले आव्हान

Wednesday, Jun 19
IMG

शिवसनेच्या 58 व्या वर्धापनदिनानिमित्त मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात उद्ध

मुंबई, दि. १९ :  शिवसेना पक्षाचा आज ५८ वा वर्धापन दिन साजरा करण्यात येत आहे. शिवसेनेतील फूटीनंतर आता दोन वेगवेगळे वर्धापन दिन साजरे करण्यात आले आहेत. शिवसनेच्या 58 व्या वर्धापनदिनानिमित्त मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी शिवसेनेच्या नवनिर्वाचित खासदारांचं स्वागत करण्यात आलं तर लोकसभा निकालानंतर उद्धव ठाकरेंची तोफ चांगलीच कडाडल्याचं पहायला मिळालं. उद्धव ठाकरेंनी यावेळी बोलताना नेहमीप्रमाणे शिंदे गटावर आणि भाजपवर तोफ डागली. परंतू यावेळी उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर देखील निशाणा साधला. आपले कोण आणि परके कोण? हे लोकसभा निकालातून कळालं, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी मनातील खंत देखील बोलून दाखवली. काही जणांनी फक्त उद्धव ठाकरे नको म्हणून बिनशर्ट पाठिंबा दिला, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना जोरदार टोला लगावला.एनडीएसोबत जाण्याच्या चर्चांना उद्धव ठाकरेंनी पूर्ण विराम दिला आहे. तर,  भुजबळांनीही संपर्क केला नाही की ठाकरे गटाकडूनही भुजबळांना संपर्क केला नसल्याचं म्हटलंय. आत्मविश्वास व अहंकारात फरक आहे. मोदींमध्ये अहंकार आहे. भुजबळ शिवसेनेत जाणार..ते मंत्री आहे ते बघतील ना असा खुलासा उद्धव ठाकरेंनी केला आहे.   नरेंद्र मोदी, भाजप, एकनाथ शिंदे, राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस सगळ्यांचा समाचार झाला. निवडणूक पाच नाही दहा टप्प्यात घेतली असती तर मी रोज यांची सालटी काढली असती असंही उद्धव ठाकरे म्हणाले. तुम्ही सर्वांनी माझं कौतुक केलंय. मला विजयाचं श्रेय मला दिलं. पण मी शून्य आहे. यशाचे मानकरी तुम्ही आहात. आत्मविश्वास आणि अहंकारमध्ये फरक आहे. मी हे करु शकतो हा आपल्यात आत्मविश्वास आहे. जगात फक्त मी हे करु शकतो, हा अहंकार आहे, तो मोदींकडं आहे. विधानसभेचा प्रचार आत्तापासून सुरु करा, हे माझं मोदींना आव्हान आहे. फक्त या षंढांना बाजूला ठेवा. शिवसेनेचं नाव, शिवसेनेचं चिन्ह बाजूला ठेवा, असं आव्हान त्यांनी पंतप्रधान मोदींना दिलं. मिंदे आणि भाजपला सांगतो तुम्ही षंढ नसाल तर  बाळासाहेब ठाकरेंचा फोटो, शिवसेनेचा धनुष्यबाण आणि शिवसेना नाव न लावता निवडणूक लढा.  मिंदेच्या वडिलांचा फोटो लावा आणि निवडणूक लढवा. विधानसभेसाठी मोदी तुम्ही सभा घ्या.. या मिंदेला बाजूला ठेवा, असं उद्धव ठाकरे म्हणाले. 

Share: