७० वर्षांवरील वृद्धांना आयुष्मान भारत योजनेच्या कक्षेत आणण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.
दिल्ली, दि. ११ : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज पार पडलेल्या बैठकीत वृद्धांना मोठी भेट देण्यात आली आहे. आता ७० वर्षे किंवा त्याहून अधिक वय असलेल्या सर्व वृद्धांना आयुष्मान आरोग्य योजनेंतर्गत आणण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यांच्यावर ५ लाखांपर्यंत मोफत उपचार होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या या निर्णयामुळे देशातील १२.३ कोटी कुटुंबांना याचा फायदा होणार असून याचा ६.५ कोटी वृद्धांना थेट लाभ होणार आहे. आयुष्यमान भारत योजनेंतर्गत वर्षाला ५ लाख रुपयांचा विमा कव्हर उपलब्ध आहे. ७० वर्षांवरील वृद्धांना आयुष्मान भारत योजनेच्या कक्षेत आणण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आता या मंजुरीनंतर ७० वर्षांवरील सर्व वृद्धांना या योजनेअंतर्गत दरवर्षी ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार घेता येणार आहेत.