यावेळी त्याच्यासोबत धक्काबुक्कीही झाली. या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे,
अकोला, दि. २१ : भारत जोडो अभियानाचे संयोजक योगेंद्र यादव यांच्या अकोल्यातील एका कार्यक्रमात वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. वंचितचे ४० ते ५० कार्यकर्ते स्टेजवर चढले व त्यांनी योगेंद्र यादव यांचं भाषण बंद पाडलं. योगेंद्र यादव यांच्या मार्गदर्शनात 'लोकशाहीची सुरक्षा आणि आपलं मत' या विषयावर चर्चासत्र आयोजित केलं होतं. या कार्यक्रमात योगेंद्र यादव भाषण करत असताना वंचितच्या कार्यकर्त्यांनी माईक हातातून हिसकावून घेत गोंधळ घातला. योगेंद्र यादव यांच भाषण सुरू असताना त्यांच भाषण बंद पाडण्यात आल्यानंतर सभागृहात मोठा गोंधळ निर्माण झाला. खुर्च्यांची तोडफोड झाली. दरम्यान यावर योगेंद्र यादव याची प्रतिक्रिया समोर आली आहे.या कार्यक्रमात संतप्त जमावाने योगेंद्र यादव यांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. भाषणाच्या वेळी ४० ते ५० संतप्त लोकांनी स्टेजवर चढून त्यांना बोलण्यापासून रोखले. यावेळी त्याच्यासोबत धक्काबुक्कीही झाली. या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात योगेंद्र यादव संतप्त जमावाशी संवाद साधताना दिसत आहेत. दरम्यान, पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि अखेर कार्यक्रम रद्द करण्यात आला.