IMG-LOGO
नाशिक शहर

वेदशास्त्र सर्वोच्च स्थानी, त्यापुढे कोणीही नाही : जगद्गुरु विद्या भास्कर वासुदेवाचार्यजी महाराज

Thursday, Aug 01
IMG

पुरस्काराचे स्वरूप एकवीस हजार रुपये संस्कृत मानपत्र, पगडी ,विद्वत शाल, स्मृतिचिन्ह व श्रीफळ असे होते.

नाशिक, दि.१ : प्राचीन वेदशास्त्र हे साक्षात नारायण स्वरूप असून आपल्या जीवनातील प्रत्येक गोष्टीमध्ये वेद आहेत. वेदमंत्र प्रारंभ करताना आपण हरी ओम म्हणतो गुरु शिष्य पद्धतीने वेदपरंपरेचे भारतातील विविध वेदशाख्यांचे वैदिकांनी प्राणपणाने अध्ययन व अध्यापनाद्वारे टिकून ठेवले आहे. भारतीय सनातन वैदिक परंपरेचे वेद मूळ असून सर्वोच्च स्थानी ते आहेत. वेदांपेक्षा काहीही श्रेष्ठ नाही असे प्रतिपादन आयोध्या धाम येथील विद्या भास्कर जगद्गुरु वासुदेवाचार्यजी महाराज यांनी केले नासिक येथील महर्षी गौतम गोदावरी वेद विद्या प्रतिष्ठान नाशिकचे संस्थापक वेदाचार्य रवींद्र पैठणे, महंत भक्तीचरणदास महाराज, सोमनाथ संस्कृत विश्वविद्यालयाचे कुलपती डॉक्टर सुकांत सेनापती, केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालय नासिक परिसराचे प्रमुख डॉक्टर गोविंद पांडे, महंत पंडित गुरुजी, उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष जगद्गुरु रामानंदाचार्य स्वामी श्री वासुदेवाचार्यजी महाराज यांच्या हस्ते चार वेद व शास्त्र अध्ययनाचे संस्कृत विषयाचे संवर्धन करणाऱ्या संपूर्ण  आयुष्य भर योगदान देणाऱ्या ऋग्वेदाचे वेदाचार्य गणेश प्रसाद तिरुपती, यजुर्वेदाचे नासिक मधील जेष्ठ वेदाचार्य दिनेश गायधनी, नगरचे सामवेदाचे वेदाचार्य तुकाराम शास्त्री मुळे, अथर्ववेदाचे वेदाचार्य गोपाळजी रटाटे वाराणसी, सकलशास्त्राचे गाढे अभ्यासक चेन्नई मधील श्री देवनाथाचार्य, संस्कृतचे डॉक्टर प्रसाद कुलकर्णी येवला या सर्वांना वेदशास्त्र गौरीशंकर राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले पुरस्काराचे स्वरूप एकवीस हजार रुपये संस्कृत मानपत्र, पगडी ,विद्वत शाल, स्मृतिचिन्ह व श्रीफळ देऊन यथोचित गौरव करण्यात आला प्रास्ताविक व स्वागत महर्षी गौतम गोदावरी वेद विद्या प्रतिष्ठानचे प्रमुख वेदाचार्य रवींद्र पैठणे यांनी केले. सूत्रसंचालन अमृता कवीश्वर व आभार प्रदर्शन गोविंद पैठणे यांनी केले यावेळी  प्रतिष्ठानचे श्री दत्तात्रय पैठणे,काळाराम मंदिराचे विश्वस्त एकनाथ कुलकर्णी, डॉक्टर सचिन पाडेकर, अखिल ब्राह्मण मध्यवर्ती चे प्रवीण कुलकर्णी, सुहास बेलापूरकर, श्री बाळासाहेब पाठक, आदी मान्यवर उपस्थित होते

Share: