शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी निवडणूक कार्यक्रमाच्या घोषणानंतर एक्स पोस्ट केली आहे.
मुंबई, दि. १५ : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची तारीख आणि निकाल या दोन्हीची तारीख जाहीर झाली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज ही घोषणा केली. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात निवडणूक कधी जाहीर होणार? याच्या चर्चा रंगल्या होत्या. काही दिवसांपूर्वी राजीव कुमार यांनी पत्रकार परिषद घेतल २६ नोव्हेंबरच्या आधी निवडणूक घेतली जाईल असं म्हटलं होतं. आज अखेर या निवडणुकीची आणि निकालाच्या दिवसाची घोषणा झाली आहे. महाराष्ट्रात एका टप्प्यात निवडणूक घेतली जाणार आहे. २० नोव्हेंबरला एका टप्प्यात निवडणूक घेतली जाणार आहेत. तर २३ नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी ही माहिती दिली आहे. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी निवडणूक कार्यक्रमाच्या घोषणानंतर एक्स पोस्ट केली आहे. “महाराष्ट्रातील जनता ज्या क्षणाची वाट पाहत होती ती वेळ आता आली आहे. २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. राज्यात बदल घडवण्यासाठी, शिंदे-भाजप सरकार हद्दपार करण्यासाठी निवडणूक जाहीर झाली आहे. आम्ही न्यायाच्या प्रतीक्षेत होतो, पण आता मतदारच आम्हाला न्याय देऊ शकतात”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.