IMG-LOGO
नाशिक शहर

विधानसभेच्या २८८ जागा लढवून आम्ही आमचे सरकार बनवू : मनोज जरांगे यांचा इशारा

Tuesday, Aug 13
IMG

मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण दिलं नाही तर राजकारणात आल्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही.

नाशिक, दि. १३ : “महाराष्ट्रामधून १७ ते १८ टक्के मराठा समाज मुंबईमध्ये गेलेला आहे. मग आपण तेथे उमेदवार निवडून आणू शकलो नाहीत, तरी तेथील १९ जागांचा कार्यक्रम केला म्हणून समजा. म्हणजे पाडलेच म्हणून समजा. आपण तेथेही शोध मोहीम सुरु केलेली आहे. आता कोकणातील काही भाग अजून बाकी राहिला आहे, तर मराठावाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ हे तीनही विभाग एका बाजूला आहेत. या तीनही विभागात यांचा सुपडा साफ होणार आहे”, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला.“मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) देण्याची मागणी केलेली आहे. पण मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण दिलं नाही तर राजकारणात आल्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही. त्यामुळे आता मराठा समाजाची कसोटी लागलेली आहे. याबाबत २९ ऑगस्ट रोजी महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत जे ठरेल त्यामागे ठाम उभे राहा”, असं आवाहनही मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला केलं.मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे यांनी केलेली आहे. या मागणीसाठी त्यांनी अनेकदा आंदोलन आणि उपोषणही केलं. मात्र, राज्य सरकारने याबाबत अद्याप कोणताही ठोस निर्णय न घेतल्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत २८८ उमेदवार उभे करण्याचा इशारा दिला आहे.मराठा आणि कुणबी एकच आहेत. सरकारने तत्काळ कायदा पारित करावा. जर सरकारने आमच्या म्हणण्याला किंमत दिली नाही तर येत्या विधानसभेला आम्ही त्यांना घरी पाठवणार आहोत. विधानसभेच्या २८८ जागा लढवून आम्ही आमचे सरकार बनवू, असे जरांगे पाटील म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांनी विनाकारण षडयंत्र रचून मराठा समाजाला टार्गेट करू नये, ते का म्हणून मराठ्यांचा एवढा द्वेष करतात? अशी  विचारणा त्यांनी केली. मराठा-ओबीसी यांच्यादरम्यान दंगल घडविण्याचा फडणवीस-भुजबळ यांचा डाव असल्याचा गंभीर आरोप जरांगे यांनी केला. सत्ताधारी पक्षातही मराठा आमदार आहेत, त्यांच्याविषयी विधानसभेला आपली काय रणनीती असेल असा प्रश्न जरांगे यांना विचारल्यावर ते म्हणाले, "जो आमच्या विरोधात बोलणार तो आमचा विरोधक असेल, जो जातीसाठी भांडणार त्याला आमची साथ असेल" असे त्यांनी सांगितले. 

Share: