IMG-LOGO
क्रीडा

T-20 WC 2024 : न्यूझीलंडचा पराभव करत वेस्टइंडीज सुपर ८ मध्ये; २ सामन्यातील पराभवाने न्यूझीलंड स्पर्धेबाहेर

Thursday, Jun 13
IMG

त्रिनिदादच्या ब्रायन लारा स्टेडियमवर न्यूझीलंडविरुद्ध वेस्ट इंडिज सामना रंगला.

त्रिनिदाद, दि. १३ : वेस्ट इंडिजने न्यूझीलंड संघाचा पराभव करत सुपर८ मध्ये पोहोचणारा तिसरा संघ ठरला आहे. संघाच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर न्यूझीलंडचा १३ धावांनी विजय मिळवला आहे. शेरफने रूदरफोर्डच्या वादळी ६८ धावांच्या जोरावर वेस्ट इंडिजने न्यूझीलंड संघाला विजयासाठी १५० धावांचे योगदान दिले. ३२ धावांवर ५ विकेट गमावले असतानाही वेस्ट इंडिजने चांगले कमबॅक करत धावांचा डोंगर रचला. तर गोलंदाजीत विडींजच्या गोलंदाजांनी लक्ष्याचा बचाव करत बलाढ्य न्यूझीलंडला पराभवाचा मोठा धक्का दिला. न्यूझीलंड संघ या पराभवासह वर्ल्डकपच्या बाहेर पडला आहे.त्रिनिदादच्या ब्रायन लारा स्टेडियमवर न्यूझीलंडविरुद्ध वेस्ट इंडिज सामना रंगला. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला तर प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने २० षटकांत ९ बाद १४९ धावा केल्या. मात्र, न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासून भेदक मारा सुरु ठेवत वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना थोड्या थोड्या धावांनी मैदानातून माघारी जाण्यास मजबूर केले. वेस्टइंडीज सामना सुरु झाल्यावर ३० धावांवर ५ विकेट अशा परिस्थितीत होती परंतु शेरफेन रदरफोर्डने शानदार खेळी करत सर्वाधिक ३९ चेंडूत नाबाद ६८ धावा केल्या.

Share: