IMG-LOGO
क्रीडा

T-20 WC 2024 : टी-२० वर्ल्ड कपच्या सुपर ८ मध्ये भारत, वेस्ट इंडीज, साउथ आफ्रिका, ऑस्ट्रिलिया

Thursday, Jun 13
IMG

तीन सामन्यांपैकी जो संघ जास्त सामने जिंकेल त्यांना सेमी फायनलमध्ये पोहोचता येऊ शकते.

त्रिनिदाद, दि. १३ : टी-२० वर्ल्ड कपमध्ये चार गट तयार करण्यात आले आहेत. या फेरीमध्ये प्रत्येक गटातील दोन अव्वल संघ सहभागी होतील. त्यामुळे प्रत्येक संघाला तीन सामने खेळण्याची संधी मिळेल. या तीन सामन्यांपैकी जो संघ जास्त सामने जिंकेल त्यांना सेमी फायनलमध्ये पोहोचता येऊ शकते. जो संघ तिन्ही सामने जिंकेल त्यांना थेट सेमी फायनलमध्ये पोहोचता येईल. पण जे संघ दोन सामने जिंकतील त्यांच्यासाठी रन रेट महत्वाचा ठरू शकतो. त्यामुळे ही फेरी सर्व संघांसाठी महत्वाची असणार आहे. भारत, वेस्ट इंडीज, साउथ आफ्रिका, ऑस्ट्रीलिया हे संघ सुपर ८ साठी पात्र ठरले आहेत. अमेरिकेविरूद्ध विजय मिळवल्याने टीम इंडियाने सुपर 8 मध्ये प्रवेश केला आहे. यामुळे आता भारताचा सुपर 8 मध्ये कोणाशी सामना होणार आहे हे निश्चित झालंय. सुपर ८ मधील तीन सामन्यांमधील एक सामना  भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात  होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. भारतीय संघ विजयासह 'अ' गटात अव्वल राहीला आहे. त्यामुळे भारताचा पहिला सामना हा 'क' गटातील अव्वल संघाबरोबर होईल. हा सामना २० जूनला ब्रिजटाऊन येथे होणार आहे. 'क' गटामध्ये सध्या अव्वल स्थानावर अफगाणिस्तानचा संघ आहे, तर दुसऱ्या स्थानावर वेस्ट इंडिजचा संघ आहे. या गटात जो संघ अव्वल स्थानावर राहील, त्याच्याबरोबर भारताचा या फेरीतील पहिला सामना होणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघ सलग ३ पैकी ३ सामने जिंकून टी-२० विश्वचषकाच्या सुपर८ टप्प्यासाठी पात्र ठरला आहे. आता टीम इंडियाचा कॅनडासोबतचा शेवटचा सामना १५ जून रोजी फ्लोरिडामध्ये होणार आहे. यानंतर भारतीय संघ सुपर ८ फेरीतील सामने खेळण्यासाठी वेस्ट इंडिजला रवाना होईल. भारत, वेस्ट इंडीज, साउथ आफ्रिका, ऑस्ट्रीलिया हे संघ सुपर ८ साठी पात्र ठरले आहेत. 

Share: