पहिल्या नोकरीत पहिला पगार सरकार देणार आहे. ही योजना सर्व क्षेत्रांना लागू असेल.
नवी दिल्ली, दि. २४ : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण देशाचा अर्थसंकल्प सादर केला. शेतकरी, तरुण, व्यावसायिक यांना या बजेडकडून खूप अपेक्षा आहे. दरम्यान अर्थसंकल्पाच्या सुरुवातीलचा अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी तरुणांसाठी रोजगारासंदर्भात 3 योजना जाहीर केल्या. अर्थसंकल्पात केलेल्या घोषणेनुसार, एक कोटी शेतकरी नैसर्गिक शेतीसाठी प्रोत्साहित केले जाणार आहे. 10 हजार जैविक केंद्र उभारले जाणार आहेत. निर्मला सितारमण या मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळात अर्थमंत्री आहेत. त्या दुसऱ्या कार्यकाळातही अर्थमंत्री होत्या. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण देशाचा सलग सातवा अर्थसंकल्प सादर केला आहे. पहिल्या नोकरीत पहिला पगार सरकार देणार आहे. ही योजना सर्व क्षेत्रांना लागू असेल. नवीन नोकरी करणाऱ्या आणि देणाऱ्या दोघांना लाभ मिळणार आहे. ईपीएफओ रजिस्टर झाल्यानंतर ५० हजार रुपयांचा इंसेन्टिव्ह मिळणार आहे. उत्पादन वाढीसाठी शेतीवर लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. सरकार आणि खासगी संस्थांकडून नवीन रिसर्च केला जाणार आहे. ईपीएफओसह फर्स्ट टाईम नोकरी करणाऱ्यांचाही डेटा गोळा केला जाणार आहे. नवीन कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 10 लाख रुपयांपर्यंत कर्जाची व्यवस्था करण्यात येईल. त्या कर्जावर ३ टक्के सवलत देण्यात येईल. यासाठी विद्यार्थ्यांना ई व्हाउचर्स दिले जाणार आहेत. नव्या रोजगार निर्मितीसाठी २ लाख कोटींची तरतूद केली जाणार आहे. १ कोटी तरुणांना इंटर्नशिप देण्यात येणार आहे.१. कर रचनेत बदल० ते ३ लाख उत्पन्न – ० टक्के कर३ ते ७ लाख उत्पन्न – ५ टक्के कर७ ते १० लाख उत्पन्न – १० टक्के कर१० ते १२ लाख उत्पन्न – १५ टक्के कर१२ ते १५ लाख उत्पन्न – २० टक्के कर१५ लाखांवर उत्पन्न – ३० टक्के करया बदलांमुळे नव्या करप्रणालीचा स्वीकार करणाऱ्या करदात्यांचा १७५०० रुपयांचा फायदा होईल.२. स्टँडर्ड डिडक्शनची मर्यादा ५० हजारांवरून ७५ हजारांपर्यंत वाढवण्यात आली आहे. पेन्शनची मर्यादाही १५ हजारांवरून २५ हजारांपर्यंत वाढवण्यात आली आहे. याचा फायदा ४ कोटी पगारदार आणि पेन्शनधारकांना होईल. ३. सोनं, चांदी व प्लॅटिनमवरीव कस्टम ड्युटी घटवल्याची घोषणा निर्मला सीतारमण यांनी केली आहे. सोने आणि चांदीसाठी ६ टक्के तर प्लॅटिनमसाठी ६.५ टक्के कस्टम ड्युटी घटवण्यात आली आहे.४. कर्करोगाच्या तीन औषधांवरील उत्पादन शुल्क कमीकर्करोगावरील तीन महत्त्वाच्या औषधांवरील उत्पादन शूल्क वगळण्यात आले आहे.५. भारतात निर्मिती होणाऱ्या मोबाईल फोनची निर्यात वाढल्याच्या पार्श्वभूमीवर भारतातील मोबाईल उद्योगाची वाढ होत आहे. मोबाईल चार्जर आणि इतर गोष्टींवरील सीमाशूल्क १५ टक्क्यांनी कमी केला.६. नोकरदार महिलांसाठी विविध योजनानोकरदार महिलांसाठी वसतिगृह उभारण्यात येतील, अशीही घोषणा निर्मला सीतारमण यांनी केली. अशा प्रकारच्या सुविधांमधून नोकरदार वर्गामध्ये महिलांची संख्या वाढण्यासाठी प्रोत्साहन दिले जाईल. सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रीय समन्वय धोरण राबवले जाईल. याशिवाय देशांतर्गत संस्थांमध्ये उच्च शिक्षणासाठी १० लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाईल.७. एंजल टॅक्स मोडीत काढण्याचा निर्णयही या अर्थसंल्पातून घेतला गेला आहे. तसेच विदेशी कंपन्यांवरील कॉर्पोरेट कर ४० टक्क्यांवरून ३५ टक्क्यांवर आणण्यात आला आहे.८. मुद्रा कर्ज योजनेत आता १० लाखांऐवजी २० लाख रुपयांचे कर्ज मिळेल. पंतप्रधान मुद्रा योजनेअंतर्गत आतापर्यंत २७.७५ लाख कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. ४७ कोटी छोट्या, मोठ्या उद्योगपतींना याचा लाभ झालेला आहे.९. शेती आणि संलग्न क्षेत्रांसाठी १.५२ लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे. १०. पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना ५ वर्षांसाठी वाढवण्यात आली. तिचा फायदा ८० कोटींहून अधिक लोकांना फायदा झाला.