महिला आशिया चषक २०२४ स्पर्धेत भारताने विजयाने आपल्या मोहिमेची सुरुवात केली आहे. भारतीय महिला संघाने पहिल्याच सामन्यात पाकिस्तानचा सात गडी राखून पराभव केला.
डम्बुला, दि. १९ : महिला आशिया चषक टी-२० स्पर्धेतील भारताने आपल्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा दारुण पराभव केला. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने ७ गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात पाकिस्तान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यादरम्यान पाकिस्तानचा संघ १०८ धावांवर गडगडला. प्रत्युत्तरात स्मृती मानधना आणि शफाली वर्मा यांच्या दमदार खेळीच्या जोरावर भारताने पंधराव्या षटकात विजयाची नोंद केली. भारताकडून गोलंदाजांनीही चमकदार कामगिरी केली. दीप्ती शर्माने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.