IMG-LOGO
विदेश

मायक्रोसॉफ्टच्या बिघाडानंतर सेवा पूर्वपदावर आणण्यासाठी अभियंते, तज्ज्ञांचे युद्धपातळीवर काम

Monday, Jul 22
IMG

क्राऊडस्ट्राइकच्या अद्यायावतीकरणातील घोळामुळे जगभरातील ८.५ दशलक्ष उपकरणांवर परिणाम झाला.

न्यूयॉर्क, दि. २२  :  मायक्रोसॉफ्टने आपल्या सायबर सुरक्षा भागीदार ‘क्राऊडस्ट्राइक’मुळे झालेल्या बिघाडानंतर सेवा पूर्वपदावर आणण्यासाठी अभियंते, तज्ज्ञांचे युद्धपातळीवर काम करत असल्याचे ‘ब्लॉग’वर म्हटले आहे. १८ जुलै रोजी क्राऊडस्ट्राइकच्या अद्यायावतीकरणातील घोळामुळे जगभरातील ८.५ दशलक्ष उपकरणांवर परिणाम झाला. जगभरातील छोटे उद्याोजक तसेच विमान कंपन्यांपासून रुग्णालयांपर्यंत सर्वच जण यंत्रणा पूर्वपदावर आणण्यासाठी झगडत आहेत.

Share: