आगामी सामना जिंकून मालिका खिशात टाकण्याचा प्रयत्न टीम इंडियाचा असणार आहे.
हरारे, दि. ११ : भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील पाच टी-ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाने 23 धावांनी विजय मिळवला. भारताने तिसऱ्या सामन्यात 23 धावांनी विजय मिळवत मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली. तिसऱ्या टी-20 सामन्यात भारताने झिम्बाब्वेसमोर 183 धावांचं मोठं लक्ष्य ठेवलं होतं. भारतीय संघासाठी कर्णधार शुभमन गिलने 66 रन्सची अर्धशतकी खेळी केली. सामन्याच्या तिसऱ्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर ब्रायन बेनेटकडे स्ट्राईक आली. त्यावेळी आवेश खानच्या हातात बॉल होता. आवेशच्या पहिल्याच बॉलवर ब्रायन बेनेटने बॅकवर्ड पॉइंटवर शॉट मारला. बॉल आरामात फोरच्या दिशेने जाईल, असं सर्वांना वाटत होतं. मात्र, पाईंटवर उभा ठाकला होता रवी बिश्नोई. बिश्नोईने हवेत उडी मारली अन् गोळीच्या स्पीडने बॉन्ड्रीकडे जात असलेला बॉल पकडला. बिश्वोईची फिल्डिंग पाहून अनेकजण चकित झाले. खुद्द ब्रायन बेनेटला देखील हसू आवरलं नाही. तर आवेश खान आणि इतर खेळाडूंनी बिश्नोईचं कौतूक केलं. बिश्नोईच्या कॅचचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाने 23 धावांनी विजय मिळवत मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे आगामी सामना जिंकून मालिका खिशात टाकण्याचा प्रयत्न टीम इंडियाचा असणार आहे.