IMG-LOGO
महाराष्ट्र

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष फ्रान्सिस दिब्रिटो यांचं निधन

Thursday, Jul 25
IMG

नंदाखाल येथील चर्चमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मुंबई, दि. २४ : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि प्रसिध्द साहित्यिक तसेच सामाजिक कार्यकर्ते फादर फ्रान्सिस दिब्रिटो  यांचे गुरूवारी पहाटे वसईतील राहत्या घरी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. संध्याकाळी ६ वाजता विरारच्या नंदाखाल येथील चर्चमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची साहित्यसंपदा आनंदाचे अंतरंग : मदर तेरेसाओअ‍ॅसिसच्या शोधात (प्रवासानुभव)परिवर्तनासाठी धर्म (वैचारिक)ख्रिस्ताची गोष्ट (चरित्र)मुलांचे बायबल (चरित्र)सुबोध बायबल – नवा करार (’बायबल दि न्यू टेस्टॅमेंट’ या पुस्तकाचा मराठी अनुवाद)सृजनाचा मोहोरख्रिस्ती सण आणि उत्सवपोप दुसरे जॉन पॉलतेजाची पाऊले (ललित)नाही मी एकलासंघर्षयात्रा ख्रिस्तभूमीची : इस्रायल व परिसराचा संघर्षमय इतिहास

Share: