भारताने नाणेफेक जिंकू प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
बारबाडोस, दि. २० : टी-२० विश्वचषक २०२४ च्या सुपर-८ मध्ये भारताने विजयासह सुरूवात केली आहे. सुपर-८ मध्ये भारताचा पहिला सामना अफगाणिस्तानसोबत होता. मात्र या सामन्यात न्यूझीलंडलसारख्या संघाला मात देणाऱ्या अफगाणिस्तानला भारताविरूद्ध दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकू प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. विजयासाठी अफगाणिस्तानला १८२ धावांचं आव्हान होते. या लक्षाचा पाठलाग करताना अफगाणिस्तानला १३४ धावाच करता आल्या. भारताच्या फलंदाजांनंतर भारतीय गोलंदाजांची आपली भूमिका चोखपणे पार पाडली. ज्यामुळे भारताने अफगाणिस्तानवर ४७ धावांनी शानदार विजय मिळवला.