IMG-LOGO
क्रीडा

Ind Vs Ban T-20 World Cup 2024 : बांग्लादेशविरुद्ध सुपर ८ फेरीतील भारताचा दुसरा सामना आज

Saturday, Jun 22
IMG

रोहित शर्माबरोबर यशस्वी जैस्वाल सलामीला येण्याची शक्यता आहे. यशस्वीला रविंद्र जडेजाच्या जागी संधी मिळू शकते.

अँटिग्वा, दि. २२ : टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या सुपर ८ फेरीत आज भारत आणि बांगलादेश यांच्यात सामना होणार आहे. सुपर ८ फेरीतील भारताचा हा दुसरा सामना आहे. यापूर्वी झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने अफगाणिस्तानवर ४७ धावांनी विजय मिळवला होता. आज होणाऱ्या सामन्यात भारताने बांगलादेशचा पराभव केला, तर उपांत्य फेरीतील भारताचा प्रवेश जवळपास निश्चित होणार आहे. हा सामना आज (२२ जून रोजी) अँटिग्वा येथील सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियम येथे खेळवला जाईल.विराट कोहलीला तिसऱ्या क्रमांकावर पाठवल्यास सलामीवीर म्हणून रोहित शर्माबरोबर यशस्वी जैस्वाल सलामीला येण्याची शक्यता आहे. यशस्वीला रविंद्र जडेजाच्या जागी संधी मिळू शकते. रविंद्र जडेलालाही या स्पर्धेत चांगली खेळी करता आलेली नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर बांगलादेशसाठी हा सामना महत्त्वाचा झाला आहे. सलामीवीर लिट्टन दास आणि तन्झिद खान यांच्या जोडीसह सुरुवातीच्या खेळाडूंची सुमार कामगिरी बांगलादेशसाठी डोकेदुखी राहिली आहे. या सामन्यात त्यांच्याकडून चांगल्या खेळाची अपेक्षा आहे.

Share: