IMG-LOGO
महाराष्ट्र

Dhramveer 2 : आनंद दिघे यांच्या तोंडी वाक्ये घालून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न : राऊत

Sunday, Jul 21
IMG

गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला गुरूचे माहात्म्य सांगणाऱ्या ‘धर्मवीर २ – साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट…’ धर्मवीर २ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला.

मुंबई, दि. २१ : बाळासाहेब ठाकरेंमुळेच आमच्यासारखे लोक एका निष्ठेने दिसत आहेत.. मात्र आमच्यातून काही नासके आंबे निघाले. असा टोला संजय राऊतानी एकनाथ शिंदेंना लगावलाय.. गुरु म्हणून त्यांनी बाळासाहेबांचा फोटो लावू नये असं आवाहनही त्यांनी केलंय.. धर्मवीर चित्रपटावरुनही त्यांनी एकनाथ शिंदेवर जोरदार हल्लाबोल केला.   गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला गुरूचे माहात्म्य सांगणाऱ्या ‘धर्मवीर २ – साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट…’ धर्मवीर २ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला.  ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर संजय राऊतानी यावर टीका केली आहे. आनंद दिघे यांना सर्वांत जास्त आम्ही ओळखतो. आजकाल आनंद दिघेंवर काहीजण स्वत:ची मालकी दाखवत आहेत.” असं म्हणून संजय राऊत यांनी नाव न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे. आनंद दिघेंच्या मनात त्यांच्याबद्दल काय भावना आणि मते होती हे आम्हाला चांगलंच माहित आहे. आम्ही जर त्यावर सिनेमे काढले तर तोंड लपवून फिरावं लागेल.”  चित्रपटामध्ये आनंद दिघे यांच्या तोंडी काही वाक्ये घालून तुम्ही तुमची राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न कराल; पण भविष्यात तुम्हीसुद्धा या आगीत चटके लागून संपल्याशिवाय राहणार नाही. आनंद दिघे यांचा संपूर्ण कालखंड आम्ही पाहिलेला आहे. दिघेंच्या नावाखाली खोट्या गोष्टी पसरवणं, हे चुकीचं आहे. आनंद दिघे आणि बाळासाहेबांचे हिंदुत्व वेगळं नव्हतं. बाळासाहेबांचे हिंदुत्वच आम्ही सगळ्यांनी स्वीकारलं. ठाण्यात काही याहून वेगळं हिंदुत्व नव्हतं.” असे ते म्हटले आहेत. 

Share: