IMG-LOGO
राष्ट्रीय

लग्न करायचं की नाही हा ज्याचा-त्याचा निर्णय; आम्ही कुणावरही बळजबरी करत नाही; जग्गी वासुदेव यांचा खुलासा

Wednesday, Oct 02
IMG

मद्रास उच्च न्यायालयानं केलेल्या एका टिप्पणीवर संस्थेनं ही प्रतिक्रिया दिली आहे.

चेन्नई, दि. २ :  ‘आम्ही कोणालाही लग्न करा किंवा ब्रह्मचारी राहा असं सांगत नाही. लग्न करायचं की नाही हा ज्याच्या-त्याच्या आवडीचा आणि निवडीचा प्रश्न आहे,’ असा खुलासा अध्यात्मिक गुरू सद्गुरू जग्गी वासुदेव यांची संस्था ईशा फाऊंडेशननं केला आहे. मद्रास उच्च न्यायालयानं केलेल्या एका टिप्पणीवर संस्थेनं ही प्रतिक्रिया दिली आहे. मद्रास उच्च न्यायालयानं (madras high court) आपल्या दोन सुशिक्षित मुलींचं ब्रेनवॉश केल्याचा आरोप करत तामिळनाडू कृषी विद्यापीठातील एका निवृत्त प्राध्यापकानं न्यायालयात धाव घेतली होती. 'माझ्या दोन सुशिक्षित मुलींचं ब्रेनवॉश करण्यात आलं आहे. त्या कायमस्वरूपी ईशा योग केंद्रात वास्तव्य करत आहेत. ही संस्था मला माझ्या मुलींशी संवाद साधू देत नाही, असा आरोप या प्राध्यापकानं याचिकेत केला होता. त्या याचिकेवर नुकतीच सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालायनं जग्गी वासुदेव यांच्या संस्थेच्या भूमिकेवर आश्चर्य व्यक्त केलं. जग्गी वासुदेव यांनी स्वत:च्या मुलीचं लग्न केलं आहे. तिचा संसार व्यवस्थित सुरू आहे. असं असताना ते इतरांना संन्यासी राहायला का सांगतायत, असा प्रश्न न्यायालयानं केला होता. त्यावर ईशा फाऊंडेशननं सविस्तर निवेदन प्रसिद्ध करून खुलासा केला आहे. 

Share: