IMG-LOGO
राष्ट्रीय

Delhi Coaching Center : पायाभूत सुविधांचा हा ऱ्हास हे व्यवस्थेचं अपयश : राहुल गांधी

Monday, Jul 29
IMG

असुरक्षित बांधकाम, निकृष्ट नियोजन आणि संस्थांच्या बेशिस्तपणाची किंमत सर्वसामान्य नागरिक आपला जीव गमावून चुकवत आहेत.

नवी दिल्ली, दि. २९  : मुसळधार पावसामुळे राजेंद्र नगर परीसर जलमय झाला असून याठिकाणी असलेल्या कोचिंग सेंटरच्या तळघरातही पाणी शिरले. त्यामुळे याठिकाणी असलेले लोक अडकले. अग्निशमन दलाला सायंकाळी ७ वाजता या घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. आतमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्यांचे फोन बंद दाखवत असल्यामुळे संपर्क होऊ शकला नाही. यावर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी टिप्पणी केली आहे. मी सर्व शोकग्रस्त कुटुंबांप्रती मनापासून संवेदना व्यक्त करतो. पायाभूत सुविधांचा हा ऱ्हास हे व्यवस्थेचं अपयश आहे. असुरक्षित बांधकाम, निकृष्ट नियोजन आणि संस्थांच्या बेशिस्तपणाची किंमत सर्वसामान्य नागरिक आपला जीव गमावून चुकवत आहेत. सुरक्षित आणि आरामदायी जीवन हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे आणि सरकारची जबाबदारी आहे”, असं खासदार राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. हा परिसर यूपीएससी परीक्षेच्या कोचिंग सेंटरसाठी ओळखला जातो. इथे शेकडो यूपीएससीची शिकवणी देणारे वर्ग आहेत. यापैकीच एका आयएएस कोचिंग सेंटरच्या तळघरात पाणी शिरल्यामुळे काही यूपीएससीचे विद्यार्थी अडकले होते. त्यापैकी दोन विद्यार्थींनींचा मृत्यू झाला असून आणखी एक व्यक्ती दगावली आहे. त्यासाठी घटनास्थळी अद्याप शोधकार्य चालू आहे. तर इतर विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.  या दुर्घटनेत श्रेया, तान्या आणि नेविन या तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. श्रेया ही उत्तर प्रदेशमधील आंबेडकर नगरमधील रहिवासी आहे. तर तान्या सोनी ही मूळची तेलंगणाची आहे. नेविन डालविन हा केरळमधील तरुण या दुर्घटनेत मरण पावला. “दिल्लीतील एका इमारतीच्या तळघरात पाणी साचल्याने तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू होणं हे अत्यंत दुर्दैवी आहे. काही दिवसांपूर्वी पावसात विजेचा धक्का लागून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता.

Share: