वरिष्ठ अधिकारी असुद्या किंवा कंत्राटदार असुद्या. त्या कंत्राटदाराला तर काळ्या यादीत टाकलं पाहिजे”, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे.
मुंबई, दि. २८ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याची घटना घडल्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. यावरून राज्यात राजकीय वातावरण तापलं आहे. दोन तीन दिवसांपूर्वी राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा वाऱ्यामुळे कोसळला. मात्र, यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्या सर्वांच्या चौकशा केल्या जातील. आता काही बातम्या येत आहेत की हे त्यांनी केलं किंवा यांनी केलं. आता कोणी काय केलं? याचा सर्व तपास लागला पाहिजे. यामध्ये मी राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून सांगतो. मी याबाबत महाराष्ट्रातील १३ कोटी जनतेची माफी मागतो. छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सर्वाचे दैवत आहेत. मात्र, त्यांचा पुतळा अशा प्रकारे कोसळणे हे सर्वांना धक्का बसणारे आहे. यामध्ये जे कोणी दोषी असतील मग ते कोणीही असूद्या. वरिष्ठ अधिकारी असुद्या किंवा कंत्राटदार असुद्या. त्या कंत्राटदाराला तर काळ्या यादीत टाकलं पाहिजे”, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे.