IMG-LOGO
महाराष्ट्र लोकसभा

Baramati Loksabha 2024 : निधी पाहिजे तर कचाकचा बटणं दाबा; अजित पवार यांचे वादग्रस्त वक्तव्य

Thursday, Apr 18
IMG

अजित पवारांनी यावेळी आपल्या विकासकामांचा देखील पाढा वाचला.

इंदापूर, दि. १८ : लोकसभा निवडणुकीची रंगत दिवसेंदिवस वाढत आहे. नेत्यांच्या प्रचारसभा त्यांची वक्तव्ये, टीका, आश्वासने यांनी गाजत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील प्रचारसभेतील एका वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. लागेल तो निधी आम्ही द्यायला तयार आहोत. तसं तुम्ही कचा-कचा मशीनमध्ये बटन दाबा, अजित पवार यांनी म्हटलं आहे. इंदापूरमध्ये अजित पवारांनी वकील आणि व्यापाऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.अजित पवारांनी यावेळी आपल्या विकासकामांचा देखील पाढा वाचला. जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा मी कामे केली आणि करत आहे. एखाद्या पदावर काम करण्याची संधी मिळाली तर पुढच्या 25 ते 50 वर्षांचा विचार करा, असा सल्लाही अजित पवारांनी दिला.

Share: