हलकन गली येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.
नवी दिल्ली, दि. २ : गेल्या काही महिन्यांपासून जम्मू-काश्मीरमध्ये सातत्याने दहशतवाही हल्ल्याच्या घटना घडत आहेत. भारतीय लष्कराचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये सातत्याने चकमकीच्या घटना घडत असल्याची माहिती समोर येते. त्या पार्श्वभूमीवर दहशतवाद्यांच्या विरोधात लष्कराच्या जवानांनी मोठ्या प्रमाणात सर्च मोहिम राबवण्यात येत आहे. या मोहिमेदरम्यान, अनंतनाग जिल्ह्यातील हलकन गली येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.