आम्ही आमचे निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी जनतेचा कोर्टात जाऊ, असे देखील ते म्हणाले.
दिल्ली, दि. १५: आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी येत्या दोन दिवसांत दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केली आहे. आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीत जनतेने त्यांचा प्रामाणिकपणा सिद्ध केला तरच मी मुख्यमंत्रिपद स्वीकारेन, असे अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे. आम्ही आमचे निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी जनतेचा कोर्टात जाऊ, असे देखील ते म्हणाले. दिल्लीतील कथित दारू घोटाळा प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा दिलासा देत त्यांचा जामीन मंजूर केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर मुख्यमंत्री केजरीवाल १५६ दिवसांनंतर तिहार जेलच्या बाहेर आले. आमची ताकद वाढल्याचे देखील केजरीवाल म्हणाले होते. दरम्यान, त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपच्या नेत्यांनी केली होती. त्यामुळे अरविंद केजरीवाल काय भूमिका घेतात या कडे सर्वांचे लक्ष लागून होते. आज दिल्ली येथील एका सभेत त्यांनी त्यांच्या राजीनाम्याची घोषणा केली.