IMG-LOGO
राष्ट्रीय

बाबा सिद्दीकींच्या घराची हल्लेखोरांकडून रेकी; गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांची नावं समोर

Sunday, Oct 13
IMG

हल्लेखोरांनी बाबा सिद्दीकींच्या घराची रेकी केली होती अशीही माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.

मुंबई, दि. १३  :  अजित पवार गटाचे नेते व माजी आमदार बाबा सिद्दीकी यांचा गोळीबारात मृत्यू झाला आहे.  मुंबईतील वांद्र पूर्व परिसरातील खेरनगरमधील राम मंदिर परिसरात घडलेल्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.  गोळीबारानंतर बाबा सिद्दीकी यांना तातडीने लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तेथे त्यांना मृत घोषित केले. तीन हल्लेखोरांपैकी दोघांना अटक करण्यात आली आहे. तर एक हल्लेखोर फरार आहे. यातील दोन हल्लेखोरांची नावं मुंबई पोलिसांनी सांगितली आहेत. यातला एक हल्लेखोर हा उत्तर प्रदेशचा तर दुसरा हरियाणाचा आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार करनैल सिंह हा हरियाणाचा राहणारा आहे आणि धर्मराज कश्यप हा उत्तर प्रदेशातला राहणारा आहे. यांच्यास आणखी एक हल्लेखोर होता. जो फरार आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेल्या आऱोपीची चौकशी सुरु आहे. बाबा सिद्दीकींची हत्या करण्यासाठी आरोपींना पैसे दिले गेले होते. तर काही दिवसांपूर्वी त्यांना हत्यारं पुरवण्यात आली होती. मुंबई पोलीस मागील आठ तासांपासून या हल्लेखोरांची कसून चौकशी करत आहेत. मागच्या दीड ते दोन महिन्यांपासून हल्लेखोरांनी बाबा सिद्दीकींच्या घराची रेकी केली होती अशीही माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.

Share: