IMG-LOGO
महाराष्ट्र

बदलापूरच्या त्या शाळेतील गेल्या १५ दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज गायब

Tuesday, Aug 27
IMG

आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

बदलापूर, दि. २७ : अत्याचाराच्या निषेधार्थ राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन केली जात आहे. या घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी केली जात असताना शाळेतील गेल्या १५ दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज गायब असल्याची बाब सरकारच्या द्विसदस्यीय अहवालातून समोर आली. महिला सेविकांनी त्यांचे काम नीट केले नाही म्हणून त्यांनाही सहआरोपी बनवण्यात यावे, अशी शिफारस करण्यात आली आहे. पीडित मुलीच्या वैद्यकीय चाचणीला उशीर झाल्याने अनेक गोष्टींवर त्याचा परिणाम झाला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. बदलापूर येथील लैंगिक अत्याचार प्रकरणी महिला व बालकल्याण विभाग आणि शिक्षण मंत्रालयाने तयार केलेला अहवाल सोमवारी शिंदे गटाचे नेते आणि शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. दीपक केसरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, बदलापूर शाळेतून गेल्या १५ दिवसांचे फुटेज गायब आहेत. हे फुटेज गायब का झाले आणि त्यामागचा हेतू काय आहे, याचा तपास होणे गरजेचे आहे, असे केसरकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. सीसीटीव्ही गायब झाल्यामुळे आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Share: