IMG-LOGO
विदेश

बांगलादेशात दुर्गापूजेवर कडक निर्बंध लादण्याचे यूनुस सरकारचे फर्मान

Wednesday, Sep 11
IMG

लाऊडस्पीकर अजान आणि नमाज दरम्यान बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. बांगलादेश सरकारच्या या आदेशाला आता विरोध होत आहे.

ढाका, दि. ११ : बांगलादेशात उसळलेल्या हिंसाचारानंतर तेथील हिंदूंची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांगलादेशचे हंगामी सरकार मोहम्मद युनूस यांना हिंदूंची सुरक्षा निश्चित करण्याची विनंती केली होती. आता बातमी समोर आली आहे की, बांगलादेश सरकारने दुर्गापूजा मंडपात दुर्गापूजेच्या वेळी वापरली जाणारी वाद्ये आणि लाऊडस्पीकर अजान आणि नमाज दरम्यान बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. बांगलादेश सरकारच्या या आदेशाला आता विरोध होत आहे. बांगलादेश ट्रिब्यूनने दिलेल्या वृत्तानुसार, बांगलादेशचे गृह विषयक सल्लागार लेफ्टनंट जनरल (निवृत्त) मोहम्मद जहांगीर आलम चौधरी यांनी मंगळवारी आदेश जारी केला की, दुर्गापूजेच्या मंडपात वापरली जाणारी वाद्ये आणि लाऊडस्पीकर अजान आणि नमाज दरम्यान बंद ठेवावेत. अजानच्या पाच मिनिटे आधी म्युझिक सिस्टीम बंद करणे बंधनकारक असेल, असेही त्यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.

Share: