IMG-LOGO
महाराष्ट्र

५७० रुपयांसाठी घेतला जीव; महावितरणच्या महिला टेक्निशियनची कोयत्याने वार करुन हत्या

Friday, Apr 26
IMG

रिंकू गोविंदराव बनसोडे (वय ३४ ) असे खून झालेले महिला कर्मचाऱ्याचे नाव आहे.

बारामती, दि. २६ :  महावितरणच्या महिला टेक्निशियनची कोयत्याने वार करुन हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. बारामती तालुक्यातील मोरगाव येथील ही घटना आहे. लाईट बिल जास्त येत आहे, अशी तक्रार करून दखल न घेतल्याने संशयिताने हे कृत्य केलं. अभिजित पोते असं संशयिताच नाव आहे. रिंकू गोविंदराव बनसोडे (वय ३४ ) असे खून झालेले महिला कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्या मूळच्या लातूर शहरातील रहिवासी असून, दहा वर्षापूर्वी महावितरणच्या सेवेत दाखल झालेल्या होत्या. गेल्या दहा वर्षापासून त्या मोरगाव येथेच कार्यरत होत्या. त्यांना एक वर्षाचा मुलगा आहे. दहा दिवसांच्या सुटीनंतर त्या बुधवारी मोरगाव कार्यालयात कामावर रुजू झाल्या होत्या. मोरगाव येथील कार्यालयात त्या एकट्याच असताना सव्वाअकराच्या सुमारास आलेल्या अभिजीत पोटे या व्यक्तीने रिंकू यांना बिल जास्त आल्याचा जाब विचारला. त्याच्याशी बोलत असतानाच अभिजित याने हातातील कोयत्याने एका मागोमाग एक असे १६ वार रिंकू यांच्या हाता-पायावर आणि तोंडावर केले. काही कळायच्या आतच रिंकू रक्ताच्या थारोळ्यात पडल्या. पोते यांच्या घराचं बिल एप्रिल महिन्यात ५७० रुपये आल्याने तो संतापला होता. मात्र उन्हाळा आल्याने वीज वापरात वाढ झाल्याने वीजबिल वाढलं असेल, असंही कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आलं. मात्र पोतेला  हे मान्य नव्हते.  

Share: