एकनाथ शिंदे यांनी संजय राऊतांना प्रत्युत्तर दिलं असून आम्ही आताही बॅग घेऊन आल्याचं म्हटलं आहे.
नाशिक, दि. १७ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुरुवारी नाशिक दौऱ्यावर होते. एकनाथ शिंदे यांचं हेलिकॉप्टर नाशिक हेलिपॅडवर पोहोचताच पोलिसांनी त्यांच्या बॅगांची तपासणी केली. यामागे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांची पार्श्वभूमी आहे. एकनाथ शिंदे बॅगांमधून पैसे घेऊन जात असल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला होता. दरम्यान यावेळी एकनाथ शिंदे यांनी संजय राऊतांना प्रत्युत्तर दिलं असून आम्ही आताही बॅग घेऊन आल्याचं म्हटलं आहे. एकनाथ शिंदे नाशिकमध्ये हेलिपॅडवर दाखल झाल्यानंतर सर्वांसमोर त्यांच्या बॅगा उघडून तपासणी कऱण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. एकनाथ शिंदे यांना जेव्हा पत्रकारांनी संजय राऊतांनी बॅगांसंबंधी केलेल्या आरोपांबद्दल विचारलं तेव्हा त्यांनी आम्ही आताही बॅग घेऊन आलो आहोत असं सांगत जास्त भाष्य करण्यास नकार दिला.