IMG-LOGO
राष्ट्रीय

Dibrugarh Express : उत्तर प्रदेशात मोठा रेल्वे अपघात, डिब्रुगड एक्सप्रेसचे १० डबे रुळावरून घसरले, २ ठार, २५ जखमी]

Thursday, Jul 18
IMG

अपघाताची माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बचावकार्याला सुरुवात झाली.

गोंडा, दि. १८ :  उत्तर प्रदेशातील गोंडा येथे दिब्रुगड एक्स्प्रेसचे १५ डबे रुळावरून घसरून झालेल्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून २५ जण जखमी झाले आहेत. ही ट्रेन चंदीगडहून येत होती. उत्तर प्रदेशातील झिलाही रेल्वे स्थानक ते गोसाई दिहवा दरम्यान हा अपघात झाला अपघाताची माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बचावकार्याला सुरुवात झाली. ईशान्य रेल्वेचे सीपीआरओ पंकज सिंह यांनी एएनआयला दिलेल्या माहितीनुसार, दुपारी २.३७ च्या सुमारास हा प्रकार घडला. अपघाताची माहिती मिळताच रेल्वेची मेडिकल व्हॅन घटनास्थळी पोहोचली. तसंच बचाव पथकही दाखल झालं. बचावकार्य तातडीनं सुरू करण्यात आलं आहे. गोरखपूर आणि गोंडा येथूनही रेल्वेचे अतिरिक्त बचाव पथक पाठवण्यात येत आहे. हेल्पलाईन क्रमांक जारी करण्यात आले आहेत. हेल्पलाइन क्रमांक जारीअपघातानंतर रेल्वे मंत्रालयानं हेल्पलाईन नंबर जारी केले आहेत.  हे क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत. व्यावसायिक नियंत्रण तिनसुकिया: ९९५७५५५९८४, फुर्केटिंग (FKG): ९९५७५५५९६६, मारियानी (MXN): ६००१८८२४१०, सिमलगुरी (SLGR): ८७८९५४३७९८, तिनसुकिया (NTSK): ९९५७५५५९५९, दिब्रुगढ (DBRG): ९९५७५५५९६०. गुवाहाटी स्थानकासाठी ०३६१-२७३१६२१, ०३६१-२७३१६२२, ०३६१-२७३१६२३ हे क्रमांक जारी केले आहेत.मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतली तात्काळ दखल  यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अपघाताची तातडीनं दखल घेऊन जखमींवर योग्य ते उपचार करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी पोहोचण्याचे आणि मदतकार्याला गती देण्याचे निर्देश दिले आहेत. आसाम सरकार योगी सरकारच्या संपर्कातआसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा हे अपघातानंतरच्या परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून आहेत. त्यांनी परिस्थितीची संपूर्ण माहिती घेतली असून प्रवाशांना आवश्यक ती मदत देण्याचे निर्देश दिले आहेत. आसाम सरकार उत्तर प्रदेश प्रशासनाच्या संपर्कात आहे, असं बिस्व सरमा यांच्या कार्यालयातून सांगण्यात आलं आहे.

Share: