डोंबिवली एमआयडीसी केमिकल कंपनीत बॉयलर स्फोट दुर्घटनेस्थळी अंबादास दानवे यांनी भेट दिली.
डोंबिवली, दि. २४ : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी डोंबिवली एमआयडीसी केमिकल कंपनीत बॉयलर स्फोट दुर्घटनेस्थळी भेट दिली. यावेळी अंबादास दानवे यांनी राज्य सरकारवर टीका केली. या कंपनीत कोणताही टेक्निकल तज्ञ नव्हता. रिअॅक्टर हॅडल करणं हे साध्या कामगाराचं काम नाही. हा स्फोट झाला याला पूर्णपणे या कंपनीचं व्यवस्थापन जबाबदार आहे. सरकार ही दुर्घटना घडण्याची वाट पाहत होतं का? असा सवाल यावेळी त्यांनी केला.अमूदान कंपनीत रिअँक्टरमध्ये स्फोट होऊन आग लागल्याची मोठी दुर्घटना गुरुवारी घडली. त्या दुर्घटनास्थळी आज प्रत्यक्ष भेट देऊन त्यांनी पाहणी केली. अकुशल कामगार व जुने रिअँक्टर वापरामुळे अशा घटना वारंवार घडतात, त्यामुळे बॉयलर प्रमाणे रिऍक्टर धोरण आणावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. याबाबत येत्या अधिवेशनात आवाज उचलणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या दुर्घटनेत जखमी झालेल्या कर्मचाऱ्यांची एम्स रुग्णालयात भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली. यावेळी जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ, उप जिल्हा प्रमुख तात्या माने, शहरप्रमुख प्रकाश तेलगोटे, कल्याण लोकसभा उमेदवार वैशाली दरेकर, युवासेना अधिकारी प्रतीक पाटील, प्रमोद कांबळी उपस्थित होते.