IMG-LOGO
राष्ट्रीय

गुवाहाटीला जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटूंब कामाख्या देवींचं घेतले दर्शन

Wednesday, Oct 23
IMG

महायुती मोठ्या ताकदीने आणि जल्लोषात विजयी होणार आहे, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटीमध्ये व्यक्त केला आहे.

गुवाहाटी, दि. २३ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या २४ ऑक्टोबर रोजी निवडणूक अर्ज दाखल करणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी आज गुवाहाटीला जाऊन सहकुटूंब कामाख्या देवींचं दर्शन घेतलं. मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांचा हा तिसरा गुवाहाटी दौरा आहे. अडीच वर्षांपूर्वी शिवेसेनेतून बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या मदतीने राज्यात सत्ता स्थापन केली आणि मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यावेळी कामाख्या देवीच्या आशीर्वादाने आम्ही सत्तास्थापन करत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं होतं. त्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष जाऊन दर्शनही घेतलं. गुवाहाटीमध्ये कामाख्या देवीचे दर्शन घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मी आता कामाख्या देवीचे दर्शन घेतले आहे. विधानसभा निवडणुकीची पहिली यादी जाहीर झाली असून लवकरच दुसरी यादी जाहीर केली जाईल. त्यानंतर निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. यामध्ये महायुती मोठ्या ताकदीने आणि जल्लोषात विजयी होणार आहे, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटीमध्ये व्यक्त केला आहे.

Share: