ही मुलगी आजोबांसोबत शाळेतून घरी येत होती. त्यावेळी बसनं तिला उडवलं.
नाशिक, दि. ११ : नाशिकमध्ये पाच वर्षाच्या चिमुरडीला सिटी लिंकच्या बसनं चिडल्याची घटना घडली. ही मुलगी आजोबांसोबत शाळेतून घरी येत होती. त्यावेळी बसनं तिला उडवलं. नाशिकरोड भागातील सिटीलिंक बस डेपोच्या परिसरातच हा प्रकार घडला. सानू सागर गवई असं या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या चिमुरडीचं नाव आहे. पाच वर्षांची सानू पहिलीमध्ये शिकत होती. हा प्रकार घडल्यानंतर बस ड्रायव्हर घटनास्थळावरुन फरार झाला होता. नाशिक पोलिसांनी काही तासांमध्येच त्याला अटक केली. या संशयित ड्रायव्हरची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. त्यामध्ये त्यानं मद्यप्राशन केल्याचे समोर आले आहे.