हेमंत गोडसे यांच्यासमोर महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांचं आव्हान असणार आहे.
नाशिक, दि. १ : शिंदे गटाने ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघातील त्यांचे उमेदवार जाहीर केले. पाठोपाठ आता नाशिकचा उमेदवारही जाहीर केला आहे. शिंदे गटाने कल्याणमधून विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांना लोकसभेची उमेदवारी दिली आहे. तर ठाण्यातून शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के हे महायुतीचे (शिंदे गट) लोकसभेचे उमेदवार आहेत. तर तर नाशिक मधून दोन टर्म खासदार राहिलेले हेमंत गोडसे यांना उमेदवारी मिळालेली आहे नाशिकच्या जागेचा तिढा अखेर सुटला आहे.हेमंत गोडसे यांच्यासमोर महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांचं आव्हान असणार आहे. महायुतीने राज्यातील ४८ पैकी ४७ जागांवरील त्यांचे उमेदवार जाहीर केले असून आता केवळ पालघरच्या जागेबाबतचा निर्णय घेतलेला नाही. नाशिक लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता केवळ दोनच दिवस उरले आहेत. अपक्ष म्हणून शांतिगिरी महाराज यांनी सुद्धा अर्ज भरलेला आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी काल शांतिगिरी महाराज यांची भेट घेत आशीर्वाद घेतले होते. तसेच उमेदवारी अर्ज मागे घेण्याबाबतही चर्चा झाल्याचे समजते.