IMG-LOGO
महाराष्ट्र

Nagpur : स्विमिंग पूलमध्ये बुडून एका तरुणाचा मृत्यू

Wednesday, Apr 24
IMG

स्विमिंग पूलात बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. हा गेल्या दोन महिन्यांपासून स्विमिंग पूलमध्ये पोहण्यासाठी जात होता.

नागपूर, दि. २४ : नागपूर येथे जलतरण तलावात पोहणे एकाच्या जिवावर बेतले आहे. अंबाझरी येथील सुधार प्रन्यासच्या स्विमिंग पूलमध्ये बुडून एका तरुणाचा मृत्यू झाला. मंगळवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे खळबळ उडाली असून या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. कुणाल किशोर साल्पेकर (वय ३६) असे स्विमिंग पूलात बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. हा गेल्या दोन महिन्यांपासून स्विमिंग पूलमध्ये पोहण्यासाठी जात होता.

Share: