IMG-LOGO
राष्ट्रीय

सेबीने अदाणींच्या घोटाळ्याप्रकरणी कारवाई केली नाही”, हिंडेनबर्गचा आणखी एक आरोप

Sunday, Aug 11
IMG

भारतात काहीतरी मोठं घडणार असल्याचा दावा हिंडेनबर्गने केला आहे.

दिल्ली, दि. ११ : अमेरिकेतील शॉर्ट सेलर फर्म हिंडेनबर्ग रिसर्चने गेल्या वर्षी अदाणी समूहावर गंभीर आरोप केले होते. हिंडेनबर्गने अहवालाद्वारे केलेल्या आरोपांचा गंभीर परिणाम अदाणी समूहातील कंपन्यांच्या शेअर्सवर झाला होता. दरम्यान, आता हिंडेनबर्ग रिसर्चने पुन्हा एकदा भारतीयांना सावधानतेचा इशारा दिला आहे. भारतात काहीतरी मोठं घडणार असल्याचा दावा हिंडेनबर्गने केला आहे. पाठोपाठ सेबीच्या विद्यमान अध्यक्षा माधवी पुरी बुच आणि त्यांचे पती या दोघांचे अदानी घोटाळ्यातील आर्थिक गैरव्यवहारासाठी वापरलेल्या दोन्ही बनावट परदेशी फंडांमध्ये भागीदारी असल्याचा आरोप हिंडेनबर्ग रिसर्चने केला आहे.हिंडेनबर्गने म्हटलं आहे की, सेबीच्या अध्यक्षा माधवी बुच आणि त्यांच्या पतीची अदाणी मनी सायफनिंग घोटाळ्यात वापरलेल्या ऑफशोर फंडात भागिदारी होती. त्यामुळे सेबीने इतक्या मोठ्या घोटाळा प्रकरणात कोणतीही कारवाई केली आहे. विशेष म्हणजे त्यांना या घोटाळ्याची  माहिती होती. त्यांनी याप्रकरणी कारवाई करण्याऐवजी हिंडेनबर्गलाच नोटीस पाठवली.

Share: