IMG-LOGO
नाशिक शहर

भारतीय खाद्य संस्कृती ही एकप्रकारे खाद्य क्रांतीच : गाढवे

Tuesday, May 21
IMG

वसंत व्याख्यानमालेत स्व. आण्णासाहेब वैशंपायन स्मृती व्याख्यानात ते 'भारताची विभिन्न खाद्यसंस्कृती आणि परंपरा' या विषयावर बोलत होते.

नाशिक, दि. २१ :  भारतीय संस्कृतीतूनच खाद्यसंस्कृतीचा उगम झाला. प्रत्येक राज्यातील खाद्य संस्कृती वेगळी आहे. प्रत्येक शंभर किलो मीटरवर या संस्कृतीत बदल होत जातो. त्यामुळे भारतीय खाद्य संस्कृती ही एकप्रकारे खाद्य क्रांती असू शकते. असे प्रतिपादन येथील इच्छामणी केटरर्सचे संचालक उत्तमराव गाढवे व त्यांचे पुत्र सागर गाढवे यांनी केले. वसंत व्याख्यानमालेत स्व. आण्णासाहेब वैशंपायन स्मृती व्याख्यानात ते 'भारताची विभिन्न खाद्यसंस्कृती आणि परंपरा' या विषयावर बोलत होते. सुरुवातीला स्व. आण्णासाहेब वैशंपायन यांच्या जीवनकार्यावर आधारित चित्रफीत दाखवून व त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालुन अभिवादन करण्यात आले. माजी महापौर प्रकाश मते, पुष्करशेठ वैशंपायन, दिलीपशेठ वैशंपायन व्यासपीठावर उपस्थित होते. व्याखानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. सुरुवातीला उत्तमराव गाढवे यांनी इच्छामणी केटरर्सचा आतापर्यंतचा प्रवास मांडला. चाळीस वर्षांपूर्वी जेव्हा हा व्यवसाय सुरू केला, तेव्हा केटरिंग हे नावदेखील नाशिकला नवीन होते. भारतीय मसाले व त्यापासून बनलेले पदार्थ प्राचीन काळापासून जगात प्रसिध्द आहेत. महाराष्ट्रात तर प्रत्येक विभागात मसाल्याची चव वेगळी आहे. या पदार्थाचा प्रचार प्रसार व्हावा यासाठी माझ्या मुलाच्या लग्नात भारतीय खाद्य संस्कृतीची माहिती देणारी पुस्तिकाच आम्ही पत्रिकेच्या रूपाने नाशिकमध्ये वाटली. त्यातुनच आमच्या व्यवसायातही या भारतीय खाद्य संस्कृतीतील अनेक पदार्थ हंगामानुसार व गुणवत्तापुर्ण बणवितो. असे सांगत त्यांनी विविध मसाले, खाद्य पदार्थ, त्यांची चव आदींची गुणवत्ता कायम राखु शकलो. या सर्वांचा परिपाक म्हणुन आम्ही विश्व साहित्य संमेलन ते कुंभमेळा अशा विविध क्षेत्रातील लाखो जणांना ही सेवा प्रदान करू शकलो. याची अनेक उदाहरणेही त्यांनी दिली. त्यामध्ये सुमित्रा महाजन यांच्या मुलाच्या लग्नात इंदौर येथे, श्री. मते यांच्या मुलाच्या लग्नात बडोदा येथील नातेवाइकाना, तसेच सुजाता सौनिक यांच्या काळात मनपाने आयोजित केलेल्या पाणी परिषदेत केलेली पुरणपोळी, राजस्थान फेस्टिवलमधील अनुभव त्यांनी यावेळी विषद केले. तसेच आपल्या स्वतःच्या वाढदिवशी आम्ही सर्व कुटुंबीय आमच्या कर्मचाऱ्यांपैकी गरजु असेल त्यांच्या घरी जाऊन त्यांना आवश्यक वस्तु देतो. दरवर्षी दिवाळीत कर्मचाऱ्यांना बोनसऐवजी आम्ही त्यांना भांडवल देऊन व्यवसायाची संधी देतो. असेही ते म्हणाले.प्रत्येक राज्याची वेगळी संस्कृती : सागर गाढवेत्यानंतर सागर गाढवे यांनी भारतीय खाद्य संस्कृतीच्या प्रवासाचा आढावा घेतला. त्यात सण-वारांनुसार खाल्ले जाणारे पदार्थ, त्यांची चव, त्याचे महत्व आदींची माहिती देताना राज्या-राज्यातील उपवासाचे विविध पदार्थ, बारशाच्या घुगऱ्या, लग्नाचे लाडु, विविध सण साजरे करताना प्रत्येक राज्यांत खाल्ले जाणारे वेगवेगळे पदार्थ, नैवैद्य आणि प्रसाद आदींची माहिती त्यांनी यावेळी दिली. ते म्हणाले की लाडुचेही प्रत्येक राज्यात वेगळे प्रकार आहेत. तसेच भारतात धार्मिक खाद्यसंस्कृती हा आणखी एक प्रकार आहे. यात शिर्डी, तिरुपती, सुवर्ण मंदिर, जगन्नाथ पुरी आदी ठिकाणांचा उल्लेख त्यांनी केला. जागतिक महासत्तेच्या वाटचालीतही भारतीय खाद्य संस्कृतीचे मोठे योगदान आहे, असेही ते म्हणाले. मुंबईचा वडापाव, नाशिकची मिसळ, भारतात मिळणारी बिर्याणी, दक्षिण भारतीय खाद्य पदार्थ आणि प्रत्येक राज्यातील खाद्य पदार्थ जगभरात कुठेही सहज मिळु शकतात. सगळीकडे इंडियन फूड फेस्टिवल हेदेखील आपल्या खाद्य संस्कृतीचे यश असल्याचेही त्यांनी सांगितले.दरम्यान, सुप्रसिद्ध पार्श्वगायक मोहम्मद रफी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त घनश्याम पटेल व सुरशारदा म्युझीकल फाऊंडेशन प्रस्तुत 'रोमँटिक मूड्स ऑफ मो. रफी' हा सदाबहार गाण्यांचा कार्यक्रम झाला. यामध्ये श्री. पटेल यांच्यासह संजय डेरे, स्मिता पांडे व रेखा सोनवणे यांनी विविध गिते सादर केली. शशांक कांबळे यांनी निवेदन केले.

Share: