IMG-LOGO
महाराष्ट्र

महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटना; पोलिसांनी दहशत दाखवावी : शर्मिला ठाकरे

Tuesday, Jul 30
IMG

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी नवी मुंबई पोलिस आयुक्तांची भेट घेत महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांवर नाराजी जाहीर केली आहे.

मुंबई, दि. ३० : "तीन घटना घडल्या असून हे फार लाजिरवाणं आहे. महिला सुरक्षित असणं पोलिसांची जबाबदारी आहे. आम्ही पोलिसांवर प्रचंड नाराज आहोत. सर्व मुलींचं रक्षण करण्याची जबाबदारी पोलिसांची आहे. पोलिसांना या केसेसमध्ये कोणताही राजकीय पक्ष अडवणार नाही. जसं पोर्शमध्ये झालं की कोणीतरी आमदार आला, तसं यामध्ये कोणीही तुम्हाला अडवणार नाही. तुम्ही तुमची दहशत दाखवा. गुन्हेगारांना पोलिसांच्या भितीने गुन्हा करणं टाळलं पाहिजे," असं शर्मिला ठाकरे म्हणाल्या आहेत. जर एखादा राजकीय पक्ष मध्यस्थी करत असेल तर पोलिसांनी त्यांची नावं उघड करावीत असंही मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे म्हणाल्या. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी नवी मुंबई पोलिस आयुक्तांची  भेट घेत महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांवर नाराजी जाहीर केली आहे. तुमची दहशत दाखवा अशा शब्दांत त्यांनी पोलिसांना कारवाईचं आवाहन केलं आहे. तसंच केंद्र सरकारकडे शक्ती कायदा संमत करत तात्काळ अंमलबजावणी करावी अशी मागणी केली आहे. 

Share: